Kadaknath Chicken Eggs : 1800 रुपये किलो विकते ‘या’ कोंबडीचे चिकन; एक अंडे 50 रुपयाला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पोल्ट्री व्यवसायाला (Kadaknath Chicken Eggs) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कोरोना काळानंतर अनेक जण आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात चिकनला मागणीही चांगली असून, दरही अधिकचा मिळतो. अशातच काही शेतकरी छोटेखानी पद्धतीने शेड उभारून पोल्ट्री व्यवसाय करताना दिसून येत आहे. हे शेतकरी आपली विशेष ओळख बाळगून असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या कोंबड्यापासून सामान्य ब्रॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत अधिक नफा देखील मिळत आहे. आज आपण कोंबड्यांच्या कडकनाथ प्रजातीबाबत (Kadaknath Chicken Eggs) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये (Kadaknath Chicken Eggs Poultry Farming)

कडकनाथ ही भारतातील एक महत्त्वाची देशी कोंबडीची जात आहे. कडकनाथ कोंबडीचे (Kadaknath Chicken Eggs) वैशिष्ट्य म्हणजे तिचे शरीर, चोच, मांस या सर्वांचा रंग काळा असतो. इतकेच नाही तर या कोंबडीचे रक्त देखील काळे असते. त्याची चव आणि दर्जा सामान्य चिकनपेक्षा कितीतरी पटीने चांगला असतो. या प्रजातीच्या कोंबडीच्या मांसाची चव आणि गुणांमुळे बाजारात त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कडकनाथ कोंबड्याचे पालन करणे, हा व्यवसाय अधिक कमाई करून देणारा व्यवसाय ठरत आहे.

1800 रुपये किलो विकते चिकन

कडकनाथ कोंबडी प्रामुख्याने 4 ते 5 महिन्यांमध्ये मांस विक्रीसाठी तयार होते. या कोंबडीचे मांस साधारणपणे 1200 ते 1800 रुपये किलोपर्यंत विकले जाते. याशिवाय या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 50 रुपये इतकी आहे. या कोंबडीच्या चिकनमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे बाजारात त्याची मागणी जास्त आहे. या कोंबडीच्या चिकनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अन्य चिकनच्या तुलनेत त्यात स्निग्ध पदार्थ आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. ज्यामुळे ते अनेक आजारांच्या पेशंटसाठी गुणकारी मानले गेले आहे. या कोंबडीच्या पालनासाठी तुम्ही जवळच्या स्थानिक कृषी आणि पशुसंवर्धन विभागात याबाबत अधिक माहिती मिळवू शकतात.

कोणत्या भागात आढळते ही कोंबडीची जात

कडकनाथ कोंबडीचे मुख्य स्थान हे मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी भागातील आहे. मात्र मागील काही काळापासून आधुनिक पद्धतींचा वापर करून, या कडकनाथ प्रजातीचे पालन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये केले जात आहे. याशिवाय शेजारील छत्तीसगड राज्य, दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्रप्रदेशसह बिहार राज्यामध्ये देखील या कोंबडीच्या पालनातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे.

कडकनाथ कोंबडीचे फायदे

  • कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
  • अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
  • दमा, अस्तमा, टीबी या आजारावरही गुणकारी
  • मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक
  • कोंबडीच्या मांस व अंडी सेवनाने हृदयविकार टाळता येतो
  • मांस व अंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
  • मधुमेहसारखा आजारही बरा होतो.
error: Content is protected !!