Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण सुरूच; पहा काय आहेत आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्यातबंदीमुळे कांदा दर (Kanda Bajar Bhav) घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील असलेल्या 4000 रुपये प्रति क्विंटल दराच्या तुलनेत सध्या शेतकऱ्यांना निम्म्याने कमी भाव (Kanda Bajar Bhav) मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे.

आजचे प्रमुख बाजार समित्यांमधील दर (Kanda Bajar Bhav Falls Today)

आज उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील काही बाजार समित्यांमधील लाल कांदा दर पुढीलप्रमाणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लाल कांद्याला आज कमाल 2444 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत कांद्याला कमाल 2150 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीत कांद्याला कमाल 2186 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, मनमाड बाजार समितीत कांद्याला कमाल 2155 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, दिंडोरी बाजार समितीत कांद्याला कमाल 2850 ते किमान 1652 रुपये तर सरासरी 1952 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण

दरम्यान मागील आठवड्यात सरासरीच्या 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नाफेड आणि NCCF कडून नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीला सुरुवात केल्याच्या मोठमोठ्या जाहिराती प्रशासनाकडून लावण्यात आल्या आहेत. नाफेडकडून नाशिक जिल्ह्यात 13 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात नाफेड आणि NCCF कडून नेमक्या कोणत्या ठिकाणी, कोणत्या केंद्रांवर खरेदी सुरू आहे, याची शेतकऱ्यांना माहिती दिलेली नाही. त्यामुळे कांदा दराबाबत संतापाचे वातावरण असतानाच आता, आता खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!