Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा बाजारात दाखल; पहा किती मिळतोय भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बांग्लादेशला 50 हजार टन कांदा निर्यात (Kanda Bajar Bhav) करण्याची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून काढण्यात आल्यानंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कांदा दरात अल्प सुधारणा झाली आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि देवळा या बाजार समित्यांमध्ये, सध्या नवीन उन्हाळ कांद्याची बऱ्यापैकी आवक सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच उन्हाळी कांद्याला (Kanda Bajar Bhav) सरासरी 1700 ते 1750 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

आजचे उन्हाळ कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav Today 5 March 2024)

लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची (Kanda Bajar Bhav) 1215 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1820 ते किमान 501 रुपये तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची 400 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1970 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल, देवळा बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची 280 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1600 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

लाल कांद्याचे आजचे दर

सोलापूर बाजार समितीत आज कांद्याची 28175 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2250 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव बाजार समितीत आज कांद्याची 7633 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1975 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1840 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज कांद्याची 13000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1966 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1725 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज कांद्याची 2736 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2200 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज कांद्याची 18308 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याला सरासरी 1200 ते 1800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.

रोजचे कांद्याचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकांचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

उन्हाळ कांदा भाव खाणार

दरम्यान, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात यंदा उन्हाळ कांद्याची (Kanda Bajar Bhav) लागवड 40 टक्क्यांनी घटली आहे. अशातच आणखी महिनाभरात लाल कांद्याचा हंगाम संपूर्णतः आटोपण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये काढणीला आलेला उन्हाळ कांदा, शेतकरी साठवणुकीवर भर देत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्यास सुविधा नाही. असेच काही शेतकरी आपला उन्हाळ कांदा बाजार आणत असल्याचे सांगितले जात आहे. यंदा कांद्याची एकूणच परिस्थिती पाहता जूनच्या ते ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा कांद्याचे दर वाढलेले पाहायला मिळण्याची शक्यता आहे. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी साठवून ठेवत असलेला उन्हाळ कांदा पावसाळ्यात चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!