Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली होती. आज मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या दिवशी मात्र राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दर (Kanda Bajar Bhav) सरासरी 1700 ते 1750 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील आजचे बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024)

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Kanda Bajar Bhav) बाजार समितीत आज 11700 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2122 ते किमान 400 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत आज 10200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 900 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज 15000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1850 ते किमान 400 तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, मालेगाव (मुंगसे) बाजार समितीत आज 20000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1915 ते किमान 700 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार समितीत आज 11000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1975 ते किमान 700 तर सरासरी 1770 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

इतर बाजार समित्यांमधील दर

मुंबई बाजार समितीत आज 10504 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2200 ते किमान 1400 तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोशी बाजार समितीत आज 465 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 400 तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत आज 3464 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1787 ते किमान 375 तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत आज 1214 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 200 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांदा दरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने घसरण होत आहे. मागील आठवड्यात दरात झालेल्या अल्प वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने ते कांदा दर आणि एकूणच निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

error: Content is protected !!