Kanda Bajar Bhav : कांद्याला 1 रुपये किलो भाव; शेतकऱ्यांचा लिलाव दोन दिवसांनी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे शेतकरी हमीभाव कायद्यासाठी (Kanda Bajar Bhav) नवी दिल्ली येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आज राज्यातील सोलापूर बाजार समितीत कांद्याला १ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःची मजुरी तर काय? पण साधा वाहतूक खर्च देखील मिळत नाहीये. औषधे आणि लागवड खर्च तर दूरच आहे. आज सोलापूर बाजार समितीत कांद्याला किमान १०० रुपये इतका कमी दर मिळाला आहे. तर राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचे किमान दर 1 रुपया ते 5 रुपये प्रति किलोपर्यंत (Kanda Bajar Bhav) घसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष असल्याचे पाहायला मिळत आहे.

कुठे मिळतोय कमी दर? (Kanda Bajar Bhav Today 14 Feb 2024)

सोलापूर बाजार समितीत आज कांद्याची विक्रमी 30820 क्विंटल आवक झाली असून, किमान 100 ते कमाल 2000 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर (Kanda Bajar Bhav) मिळाला आहे. याशिवाय राज्यातील संगमनेर (अहमदनगर) बाजार समितीत आज कांद्याची 4814 क्विंटल आवक झाली असून, किमान 151 ते कमाल 1811 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा (सोलापूर) बाजार समितीत आज कांद्याची 381 क्विंटल आवक झाली असून, किमान 160 ते कमाल 1400 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय पारनेर (अहमदनगर) बाजार समितीत किमान २०० रुपये तर छत्रपती संभाजीनगर, अकलुज, बारामती, मनमाड, देवळा या बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याच्या किमान दरात 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली आहे.

आवकमध्ये मोठी वाढ

कांदा निर्यातबंदी केल्यानंतर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे साधे ढुंकून पाहण्याचे कष्ट देखील घेतले नाही. परिणामी सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची अफाट आवक होत असून, आज लिलावाला आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा लिलाव दोन दिवसांनी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. निर्यातबंदीमुळे माल बाहेर जात नसल्याने व्यापारी देखील आम्ही माल ठेवायचा कुठे? असे म्हणून हात वर करत आहेत. त्यामुळे “इथेच पिकवा, इथेच खा” अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

हमीभावाचा तिढा कायम

दरम्यान, राज्यातील अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये आज सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कांद्याच्या याच दर घसरणीला कंटाळलेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी काल (ता.१३) दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, राज्यातील शेतकरी संघटना दिल्लीला रवाना झाल्या आहे. कांदा पिकाला हमीभाव दिला जावा. अशी सर्वच कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांची मागणी आहे. यासाठी राज्यातील कांदा उत्पादकांनी अनेकदा आंदोलने देखील केली. मात्र, अजुनपर्यंत हाती काही लागलेले नाही.

error: Content is protected !!