Kanda Bajar Bhav : कांदयाला 1 रुपये किलो भाव; नवीन उन्हाळ कांद्याचीही दैना, वाचा आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात कांदा दरात (Kanda Bajar Bhav) चढ-उतार सुरूच असून, आज कांदा दर 1 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. राज्यात आज सोलापूर, मंगळवेढा, राहुरी या बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ किमान 100 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. तर अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200 ते 800 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज नवीन उन्हाळ कांद्याला देखील किमान 300 ते 700 रुपये तर कमाल 1600 ते 1640 रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याची देखील दैना झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 16 March 2024)

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत (Kanda Bajar Bhav) आज 4000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1605 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव बाजार समितीत आज 3315 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1591 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1480 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज 10000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1540 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज 25998 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 100 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा बाजार समितीत आज 10 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1450 ते किमान 100 रुपये तर सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

राहूरी बाजार समितीत आज 15492 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 100 रुपये तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज 8388 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 2913 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1400 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजार समितीत आज 6693 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सोलापुरात उच्चांकी आवक

कांदा बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या घडीला सोलापूर जिल्ह्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे. ज्यामुळे त्या ठिकाणी व्यापारी कांदा खरेदीसाठी अनुत्सुकता दाखवत असून, परिणामी कांदा दर (Kanda Bajar Bhav) निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. ज्या ठिकाणी आवक योग्य त्या प्रमाणात होत त्या ठिकाणी कांदा दराने आपला एक पातळी टिकवून ठेवली आहे. मात्र असे असले तरी सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याला देखील या दर घसरणीमुळे फटका सहन करावा लागतो आहे.

error: Content is protected !!