Kanda Bajar Bhav : कांदा दरात अल्प सुधारणा; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कॅबिनेट मंत्री समितीची (Kanda Bajar Bhav) बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 3.50 लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी केंद्राकडून निर्यातबंदी हटवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्याबाबतची अधिसूचना सरकारने अजूनही जारी केलेली नाही. असे असले तरी रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या सुट्ट्यानंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज कांदा दरात काहीशी सुधारणा झाली आहे. कांदा निर्यातीस परवानगी देण्याच्या आधी राज्यातील कांदा दर (Kanda Bajar Bhav) सरासरी 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. मात्र आज त्यात 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे.

कमाल 2000 रुपये दर कुठे? (Kanda Bajar Bhav Today 20 Feb 2024)

कोल्हापूर बाजार समितीत आज 3417 क्विंटल आवक (Kanda Bajar Bhav) झाली असून, कमाल 2500 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 8226 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2400 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल, मुंबई (वाशी) बाजार समितीत आज 9707 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2200 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत (नाशिक) बाजार समितीत आज 8000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2021 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल, कळवण (नाशिक) बाजार समितीत आज 2900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल, सिन्नर (नाशिक) बाजार समितीत आज 232 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अन्य बाजार समित्यांमधील दर

लासलगाव (नाशिक) बाजार समितीत आज 8347 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1952 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, विंचूर (नाशिक) बाजार समितीत आज 10300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1901 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, येवला (नाशिक) बाजार समितीत आज 5000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 350 रुपये तर सरासरी 1675 रुपये प्रति क्विंटल, मनमाड (नाशिक) बाजार समितीत आज 3400 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1721 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कांदा बाजारात संभ्रम

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवण्याची घोषणा केलेली असली तरी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात (Kanda Bajar Bhav) अपेक्षित वाढ झालेली नाही. निर्यातबंदी हटवण्याबाबतची अधिसूचना सरकारकडून अद्यापही जारी करण्यात आली असल्याने व्यापारीवर्ग आणि शेतकरी संभ्रमात आहेत. ज्यामुळे कांदा दरात अपेक्षित झालेली नसल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा दरात आज अल्प सुधारणा दिसून आलेली असली तरी केंद्र सरकारकडून घोषणेव्यतिरिक्त अन्य कोणतीही स्पष्टता करण्यात आली नसल्याने कांदा बाजारात संभ्रम कायम आहे.

error: Content is protected !!