Kanda Bajar Bhav : कांदा दरात मोठी घसरण; सरकारच्या स्पष्टीकरणानंतर पहा आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने रविवारी (ता.18) कांदा निर्यातबंदी (Kanda Bajar Bhav) हटवण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये गेले तीन दिवस कांदा दरात सुधारणा झाली होती. मात्र, पुन्हा पलटी घेत 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली असल्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून बुधवारी (ता.21) सांगण्यात आले. परिणामी, आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर जवळपास सरासरी 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. जे मंगळवारी 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले होते. अर्थात कांदा दरात (Kanda Bajar Bhav) आज मंगळवारच्या तुलनेत जवळपास 10 टक्क्यांनी घट झाली आहे.

आजचे राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 22 Feb 2024)

लासलगाव बाजार समितीत (Kanda Bajar Bhav) आज 8636 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1600 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1451 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 15000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1952 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीत आज 12500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1580 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1475 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 20136 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1700 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज 12000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1601 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1401 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 1532 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1950 ते किमान 550 रुपये तर सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल, मनमाड बाजार समितीत आज 3500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1489 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज 5294 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

‘कांद्याचे दर पुन्हा पूर्वपदावर’

परिणामी, दोनच दिवसांमध्ये सरकारच्या निर्णयाच्या परिणाम दिसून आल्याने बाजार समित्यांमध्ये सरकारविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, “केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर गेले दोन दिवस वाढलेले कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.” त्यामुळे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा बेभावात विक्री करावा लागत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाले.

error: Content is protected !!