Kanda Bajar Bhav : कांदा दराची लोळवण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील पंधरवड्यात कांदा (Kanda Bajar Bhav) निर्यातवर निर्बंध घातल्यानंतर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दराने सरासरी 1200 ते 1700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत लोळवण घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. आज प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दर (Kanda Bajar Bhav) चालू हंगामातील सर्वात निच्चांकी पातळीवर लोळवण घेताना दिसून आले.

आजचे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav 23 Dec 2023)

आज नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1700 ते किमान 1200 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल, येवला येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1738 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, येवला येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1738 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, विंचूर येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1900 ते किमान 751 रुपये तर सरासरी 1725 रुपये प्रति क्विंटल, चांदवड येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1901 ते किमान 511 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, मनमाड येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1848 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

राज्यातील अन्य बाजार समित्यांमधील दर

छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत कांद्याला (Kanda Bajar Bhav) कमाल 1800 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल, धुळे येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 2400 ते किमान 100 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल, धाराशिव येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 2000 ते किमान 1400 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल, भुसावळ येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1500 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल, पुणे-मोशी येथील बाजार समितीत कांद्याला कमाल 1600 ते किमान 300 रुपये तर सरासरी 950 रुपये प्रति क्विंटल प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये रोष

यावर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अशात देखील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा लागवड केला. विशेष म्हणजे मागील वर्षी कांद्याचे दर पडल्याने त्यावेळी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. आता ऐन कांदा काढणीला आता असताना सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!