Kanda Bajar Bhav : कांदा दरात पुन्हा सुधारणा; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केल्यानंतर राज्यातील कांदा दर (Kanda Bajar Bhav) गुरुवारी (ता.22) घसरले होते. मात्र आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा झाली आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला कमाल 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. ज्यात आज 1792 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज गुरुवारच्या तुलनेत कांदा दरात (Kanda Bajar Bhav) जवळपास 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलने वाढ पाहायला मिळाली आहे.

कुठे झाली दरात सुधारणा? (Kanda Bajar Bhav Today 23 Feb 2024)

लासलगाव बाजार समितीत आज 8313 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1792 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1670 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. विंचूर बाजार समितीत आज 12500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2016 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 18000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज 30627 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2700 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

येवला बाजार समितीत आज 15000 क्विंटल आवक (Kanda Bajar Bhav) झाली असून, कमाल 1855 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, दिंडोरी-वणी बाजार समितीत आज 5846 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2081 ते किमान 1051 रुपये तर सरासरी 1521 रुपये प्रति क्विंटल, देवळा बाजार समितीत आज 3950 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 355 रुपये तर सरासरी 1680 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार समितीत आज 4000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1850 ते किमान 780 रुपये तर सरासरी 1680 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कुठे आहेत दर स्थिर?

मुंबई बाजार समितीत आज 9757 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 1400 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 16156 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1700 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज 4861 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2200 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान, आज सोलापूर बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात प्रति क्विंटल मागे 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय मागील सोमवार ते गुरुवारच्या तुलनेत झालेल्या आवकच्या तुलनेत आज सर्वच मार्केट वाहनांनी फुल झाल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!