Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण; वाचा.. राज्यातील आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचानलयाने शुक्रवारी (ता.22) अधिसूचना जारी करत, कांदा (Kanda Bajar Bhav) निर्यातबंदी 31 मार्चनंतर पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. अशातच आज कांदा दरात काहीशी घसरण दिसून आली आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1100 ते 1300 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. इतकेच नाही तर कांद्याच्या कमाल दरात (Kanda Bajar Bhav) देखील घसरण दिसून आली आहे.

उन्हाळ कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 23 March 2024)

लासलगाव बाजार समितीत (Kanda Bajar Bhav) आज 3502 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1536 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1380 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 5300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1511 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1375 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज 3500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1451 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल, मनमाड बाजार समितीत आज 500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1362 ते किमान 1001 रुपये तर सरासरी 1130 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीत आज 3900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1476 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

लाल कांद्याचे बाजारभाव

कोल्हापूर बाजार समितीत आज 5253 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 1309 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1400 ते किमान 300 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोशी बाजार समितीत आज 479 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1000 ते किमान 500 रुपये तर सरासरी 750 रुपये प्रति क्विंटल, धुळे बाजार समितीत आज 1043 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1320 ते किमान 100 रुपये तर सरासरी 1170 रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजार समितीत आज 4088 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीचा मार्ग

कांदा निर्यातबंदीच्या (Kanda Bajar Bhav) धोरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गेले तीन महिने कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने, शेतकऱ्यांकडून निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात होती. अशातच आता केंद्राकडून अधिकृतरित्या निर्यातबंदी कायम ठेवण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामुळे देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कांदा निर्यातबंदीचा निर्णय कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. परिणामी, शेतकरी उन्हाळी कांदा साठवणुकीवर भर देण्याची शक्यता बळावली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात कांदा दरवाढ झाल्यास त्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. साठवणुकीशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा मार्गही उपलब्ध नाही.

error: Content is protected !!