Kanda Bajar Bhav : बांग्लादेशसह 2 देशांना कांदा निर्यातीस परवानगी; मात्र, शेतकऱ्यांना फायदा नाहीच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज प्रामुख्याने महाशिवरात्री असल्याने अनेक शेतमालाचे लिलाव बंद (Kanda Bajar Bhav) होते. मात्र, राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज अर्धा दिवस कांद्याचे लिलाव सुरु होते. मागील काही दिवसांपासून राज्यातील कांदा दर सरासरी 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सरकारने बांग्लादेशसह अन्य दोन देशांना कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र, कांदा दर स्थिरच (Kanda Bajar Bhav) असल्याने, तीन देशांना निर्यातीस परवानगी देऊनही त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही. ज्यामुळे कांदा निर्यातबंदी पूर्णतः उठवण्याची मागणी केली जात आहे.

आजचे राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 8 March 2024)

जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत आज 11364 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2350 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत आज 2661 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2100 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, संगमनेर बाजार समितीत आज 679 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, पारनेर बाजार समितीत आज 14090 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1375 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव – निफाड जार समितीत आज 830 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1970 ते किमान 1050 रुपये तर सरासरी 1921 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मनमाड बाजार समितीत आज 1500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1948 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज 4529 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 17182 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल, खेड-चाकण बाजार समितीत आज 150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 1300 रुपये तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा बाजार समितीत आज 58 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1500 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

निर्यातबंदी पूर्णतः हटवावी

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने बांग्लादेशसह अन्य दोन देशांना एकूण 64 हजार 400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्राच्या या निर्णयाचा कांदा बाजारावर कोणत्याही परिणाम झालेला नसून, दर एका पातळीवर स्थिर आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीत लिलावादरम्यान नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. सरकारने केवळ एक किंवा दोन देशांना निर्यातीसाठी परवानगी न देता पूर्णतः कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी बाजारात कांदा विक्रीस आलेले शेतकरी करत आहे.

error: Content is protected !!