हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा दरातील (Kanda Bajar Bhav) चढ-उतार सुरूच आहे. निर्यातबंदी होऊन तीन आठवडे झाले असून, शेतकऱ्यांना आपला कांदा सरासरी 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दराने नाईलाजास्तव बाजारात विक्री करावा लागत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील गेल्या तीन आठवड्यांपासून कांदा जैसे थे असून, निर्यातबंदीनंतर कांदा दरात (Kanda Bajar Bhav) निम्म्याहून अधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आजचे कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 1 Jan 2024)
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याची आज 12422 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2027 ते किमान 850 रुपये तर सरासरी 1801 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आज 7968 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2024 ते किमान 911 रुपये तर सरासरी 1870 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीमध्ये कांद्याची आज 10000 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 1990 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याची आज 10000 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2026 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, कळवण बाजार समितीमध्ये कांद्याची आज 4500 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2280 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
इतर बाजार समित्यांमधील दर
शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे कांदा पिकांचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. पुणे बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) आज 8052 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2500 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीमध्ये कांद्याची आज 443 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2200 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याची आज 1860 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2200 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 2025 रुपये प्रति क्विंटल, वाशी बाजार समितीमध्ये कांद्याची आज 7299 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 2400 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 1950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
‘उन्हाळ’ची आवक पूर्णतः घटली
दरम्यान, सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक पूर्णतः घटली असून, लाल कांद्याच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाळा कांद्याच्या आवकमध्ये घट झाल्याने लाल कांद्याच्या दरात अल्प सुधारणा आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली आहे. मात्र हा चढ-उताराचा खेळ सुरूच असून, महिनाभरापूर्वी चार हजार रुपयांहून अधिकचा दर असलेला कांदा वीस दिवसांतच निम्म्या दरांवर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.