Kanda Chal Anudan : कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! 5 हजार 700 कांदाचाळीचे होणार वाटप, अर्ज कसा करायचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kanda Chal Anudan । राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असतात. ज्याचा फायदा देशातील लाखो शेतकरी घेत असतात. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतात. परंतु दुःखाची बाब अशी की कधीतरीच कांद्याला चांगले भाव असतात. अनेकदा शेतकऱ्यांना कांदा भाव मिळत नसल्याने फेकून द्यावा लागतो.

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सध्या टोमॅटोला चांगले भाव मिळत आहे. आता त्यापाठोपाठ कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांना कांदाचाळीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

मंजूर झालेल्या या रकमेतून राज्यातील २० जिल्ह्यांत ५ हजार ७१४ कांदाचाळ उभारण्याचे उद्दिष्ट आहे. उत्पादनाचा विचार केला तर कांदा उत्पादनात नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पुणे जिल्हा अग्रेसर आहे. प्रत्येक वर्षी राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी २० टक्के जास्त प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. Kanda Chal Anudan

तुम्हाला जर सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती मोफत मिळवायची असेल तर लगेचच प्ले स्टोअरला जा आणि आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारच्या नवनवीन योजनांविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, रोपवाटिकांची माहिती, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही मोफत मिळवू शकता.

असे असले तरीही कांद्याची साठवण करण्यासाठी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदाचाळ उपलब्ध नाही. सरकार यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २५ टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. परंतु सध्या कांदाचाळीवर लोखंड, सिमेंट, जाळीच्या वाढलेल्या दरांचा परिणाम होत आहे.

error: Content is protected !!