Kanda Chal Anudan : कांदा चाळीसाठी अनुदान हवंय, ..असा करा अर्ज; लागतात ‘ही’ कागदपत्रे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Kanda Chal Anudan) फारच निराशाजनक राहिले. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात उत्पादन खर्चही मिळाला नाही. तर आता राज्याच्या काही भागांमध्ये धरणातून सुटणाऱ्या आवर्तनांच्या माध्यमातून, उन्हाळी हंगामात (Summer season) शेतकऱ्यांनी काही प्रमाणात उन्हाळ कांदा पिकवला. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा साठवणूक (Kanda Chal Anudan) करण्याची वेळ आली आहे.

मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सोय नसल्याने, त्यांना बेभावात उन्हाळ कांदा विक्री करावा लागत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील कांदा चाळ उभारण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण कांदा चाळीसाठी राज्य सरकारमार्फत अनुदान (Kanda Chal Anudan) कसे मिळवायचे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

किती मिळते अनुदान? (Kanda Chal Anudan)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा साठवताना तो काळजीपूर्वक साठवावा लागतो. कारण, भविष्यातील कांदा दरवाढीचा (Onion rate) निश्चित कालावधी माहिती नसल्याने, तो अधिक काळ चाळीमध्ये ठेवावा लागू शकतो. यासाठी सुसज्ज अशी कांदा चाळ उभारण्यासाठी, शेतकऱ्यांना 5, 10, 15, 20 व 25 मेट्रिक टन क्षमतेची चाळ उभारणीसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने एकूण चाळीच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा मग 3500 रुपये प्रति मेट्रिक टन इतके अनुदान दिले जाते. सर्वसाधारणपणे एका शेतकऱ्याला केवळ 25 मेट्रिक टन क्षमतेपर्यंतच्या चाळीसाठीच अनुदान मिळते. त्यापेक्षा अधिकच्या चाळीसाठी शेतकऱ्याला स्वखर्च करावा लागतो.

काय आहेत योजनेच्या अटी?

  • स्वतःच्या मालकीची जमीन असावी. त्या जमिनीवर चालू वर्षी कांदा पिकाची नोंद असावी.
  • अनुदानासाठी शेतकऱ्याने कांदा पीक घेणे बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, स्वयं-सहायता गट, महिला शेतकऱ्यांचा गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ घेऊ शकतात.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • 7/12, उतारा, 8 अ उतारा
  • आधार कार्डची झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
  • यापूर्वी सरकारी योजनेतून कांदा चाळीसाठी लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र.

कुठे कराल अर्ज?

  • कांदा चाळीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘हॉर्टनेट’ या सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • हॉर्टनेट संकेतस्थळावर इच्छुक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.
  • हा नोंदणी केलेला अर्ज सर्व कागदपत्रे जोडून जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
  • तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संमती दिल्यानंतरच कांदा चाळीचे काम सुरु करावे.
  • त्यानंतर दोन महिन्यात कांदा चाळ उभारणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
error: Content is protected !!