Kapus Bajar Bhav : कापसाला 8100 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत वगळता आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कापूस दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला उच्चांकी कमाल 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यातील कापूस दराने (Kapus Bajar Bhav) 8 हजारांचा टप्पा पार केला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव? (Kapus Bajar Bhav In Maharashtra)

बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8100 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7575 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत आज 10000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7785 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-माढेली बाजार समितीत आज 1200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6350 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 79 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 7300 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव बाजार समितीत आज 1552 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत आज 382 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7310 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत आज 174 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7250 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीत आज 1496 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7150 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत आज 4 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6500 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दर तेजीत राहण्याची शक्यता

दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील सर्व भागांतील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस घटत चालली आहे. अशातच निर्यात आणि देशांतर्गत मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे कापूस दर (Kapus Bajar Bhav) वाढीला बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात कापसाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक छोट्या शेतकऱ्यांनी ठेवायला जागाच नसल्याने, बेभावात आपला कापूस यापूर्वी विक्री केला आहे. तर काही प्रमाणात ज्यांच्याकडे साठवणूक करण्यासाठी सोय आहे शेतकऱ्यांनीच कापूस साठवून ठेवला आहे. ज्यामुळे सध्या होत असलेल्या कापूस दर वाढीचा फायदा या शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!