हॅलो कृषी ऑनलाईन: चालू खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले असून, दर (Kapus Bajar Bhav) एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये कमी आहेत. एमएसपी प्रतिक्विंटल 7020 रुपये असली तरी सध्या कापसाला प्रतिक्विंटल 6600 ते 6750 रुपये दर मिळत आहे. हंगामात देशात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घटणार असून, ते 295 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 1 नोव्हेंबर 2023 रोजी व्यक्त केला होता. तेलंगणा वगळता इतर 11 राज्यांमध्ये सीसीआयची कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) सध्या संथ आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कापसाचे आजचे बाजारभाव (Kapus Bajar Bhav) खालील प्रमाणे आहे
अमरावती बाजार समितीत आज 64 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6600, कमीत कमी 6500 तर सर्वसाधारण दर 6550 मिळाले आहे.
अकोला बाजार समितीत आज 111 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 7000, कमीत कमी 6900 तर सर्वसाधारण दर 6950 मिळाले आहे.
अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत आज 163 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 7153, कमीत कमी 6800 तर सर्वसाधारण दर 6976 मिळाले आहे.
उमरेड बाजार समितीत आज 1908 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 4550, कमीत कमी 3500 तर सर्वसाधारण दर 4200 मिळाले आहे.
देउळगाव राजा बाजार समितीत आज 5163 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6820, कमीत कमी 6100 तर सर्वसाधारण दर 6650 मिळाले आहे.
नेर परसोपंत बाजार समितीत आज 26 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 5000, कमीत कमी 5000तर सर्वसाधारण दर 5000 मिळाले आहे.
काटोल बाजार समितीत आज 271क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6750, कमीत कमी 5400 तर सर्वसाधारण दर 6700 मिळाले आहे.
हिंगणा बाजार समितीत आज 32 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6700, कमीत कमी 6250 तर सर्वसाधारण दर 6700 मिळाले आहे.
सिंदी(सेलू) 2110 क्विंटल आवक, जास्तीत जास्त दर 6920, कमीत कमी 6550 तर सर्वसाधारण दर 6800 मिळाले आहे.
हिंगणघाट बाजार समितीत आज 10000 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6930, कमीत कमी 6000 तर सर्वसाधारण दर 6300 मिळाले आहे.
पुलगाव बाजार समितीत आज 7450 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6951, कमीत कमी 6000 तर सर्वसाधारण दर 6750 मिळाले आहे.
फुलंब्री बाजार समितीत आज 160 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर 6750, कमीत कमी 6650 तर सर्वसाधारण दर 6700 मिळाले आहे.
कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्यासाठी टेक्सटाइल लाॅबीने सायकाॅलाॅजिकल प्रेशरचा वापर करीत केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला आहे. सरकारने आयात शुल्क रद्द केल्यास कापसाचे दर (Kapus Bajar Bhav) आणखी घसरण्याची शक्यता बळावली आहे.