Kapus Bajar Bhav : कापूस दर 9000 रुपयांचा टप्पा गाठणार? पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कापूस दरवाढीला (Kapus Bajar Bhav), मागणीत वाढ झाल्याचा टेकू मिळाला आहे. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने साठवणुकीस प्राधान्य दिले होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांनी विक्री ऐवजी कापूस साठवणूक केली होती. अशा शेतकऱ्यांची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यात कापसाचा कमाल दर 8300 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर स्थिर असला तरी लवकरच राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) 9000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत झेपावू शकतात. अशी शक्यता कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहे.

आजचे राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav 13 March 2024)

परभणी बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 1875 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8300 ते किमान 7995 रुपये तर सरासरी 8045 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत आज 78 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8200 ते किमान 7400 रुपये तर सरासरी 7800 रुपये प्रति क्विंटल, देउळगाव राजा (बुलढाणा) बाजार समितीत आज 2400 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7800 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2700 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7940 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अकोला बाजार समितीत आज 106 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 7550 रुपये तर सरासरी 7675 रुपये प्रति क्विंटल, उमरेड (नागपूर) बाजार समितीत आज 396 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7600 रुपये प्रति क्विंटल, मारेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज 922 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7775 ते किमान 6975 रुपये तर सरासरी 7375 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 94 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7600 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

पारशिवनी (नागपूर) बाजार समितीत आज 704 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 7050 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, काटोल बाजार समितीत आज 165 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, फुलंब्री बाजार समितीत आज 172 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7200 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दरवाढीमुळे शेतकरी सुखावले

सध्या राज्यातील कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीने जेरीस आणले आहे. अशातच तूर उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकरी (Kapus Bajar Bhav) मात्र दर एका विशिष्ट पातळीवर असल्यामुळे सुखावले आहे. आगामी काळात कापूस मागणीत आणखी वाढ होऊन, कापूस दर 9000 रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठू शकतात. अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या घडीला एकाच वेळी सर्व कापूस विक्री न करता, टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जाते आहे.

error: Content is protected !!