Kapus Bajar Bhav : कापसाला 7500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे देखील मुश्किल झाले होते. अशातच आज कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत आज कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटलचा दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे. त्यामुळे आज देऊळगाव राजा बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. बाजार समितीत आज एकूण 3160 क्विंटल कापसाची आवक झाली.

कुठे मिळतोय हमीभाव? (Kapus Bajar Bhav Today 15 Feb 2024)

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत आज 10000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7300 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6600 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत आज 2640 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7255 ते किमान 6550 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल, अकोला येथील बोरगाव मुंज बाजार समितीत आज कापसाची 122 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7195 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7047 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान, वरील बाजार समित्या वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे. केंद्र सरकारने 2023-24 च्या हंगामासाठी कापसाला उच्च प्रतिसाठी 7020 रुपये प्रति क्विंटल तर सामान्य दर्जाच्या कापसासाठी 6600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निर्धारित केलेला आहे.

आजचे राज्यातील कापूस बाजारभाव

अकोला बाजार समितीत कापसाची 101 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 6930 रुपये तर सरासरी 6965 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बाजार समितीत कापसाची 368 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6900 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6550 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत कापसाची 508 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6890 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव बाजार समितीत कापसाची 1399 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 ते किमान 6750 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत कापसाची 165 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6800 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीत कापसाची 3600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6750 ते किमान 6750 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील आष्टी बाजार समितीत कापसाची 122 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7195 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7047 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर बाजार समितीत कापसाची 144 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6650 ते किमान 6550 रुपये तर सरासरी 6600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!