Kapus Bajar Bhav : कापूस दरात मोठी वाढ; पहा राज्यातील आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. कापसाला मागील आठवड्यात राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कमाल 7000 रुपये प्रति क्विंटलहुन कमी दर मिळत होता. मात्र, काल आणि आजही बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर अन्य बाजार समित्यांमध्येही कापूस दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे सध्या कापसाच्या दराने (Kapus Bajar Bhav) उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे.

कुठे मिळाला हमीभाव? (Kapus Bajar Bhav Today 16 Feb 2024)

अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समितीत आज प्रति क्विंटलमागे जवळपास 150 रुपये वाढ (Kapus Bajar Bhav) नोंदवली गेली आहे. बाजार समितीत आज 122 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7339 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7169 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2950 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7300 ते किमान 6700 रुपये तर सरासरी 7050 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज 111 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7030 ते किमान 6780 रुपये तर सरासरी 6905 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अन्य बाजार समित्यांमधील दर

नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत आज 491 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6980 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव बाजार समितीत आज 1297 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत आज 155 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6800 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीत आज 3600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6750 ते किमान 6750 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीत आज 852 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6725 ते किमान 6450 रुपये तर सरासरी 6600 रुपये प्रति क्विंटल, जळगाव जिल्ह्यातील यावल बाजार समितीत आज 363 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6640 ते किमान 6050 रुपये तर सरासरी 6320 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, राज्यातच नाही तर देशपातळीवर आणि वैश्विक बाजारातही कापूस दराने (Kapus Bajar Bhav) उसळी घेतली आहे. कापसाला वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत बाजारात होत असलेला कमी पुरवठा यामुळे दरवाढ झाल्याचे कापूस व्यापारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे. इतकेच नाही तर आणखी आठवडाभरात कापूस दरात आणखी वाढ होऊन ते सरासरी 7000 हजारांचा टप्पा ओलांडून पुढे सरकतील, अशी शक्यताही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आणखी दरवाढ झाल्यास त्याचा निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!