हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षीच्या हंगामात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) असलेली स्थिरता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दरात घसरण झाली आहे. या दर घसरणीमुळे कापसाचा किमान आधारभूत दर 7020 रुपये प्रति क्विंटल असताना, बाजार समित्यांमध्ये व्यापारी मात्र सरासरी 6300 ते 6500 रुपये दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रमुख बाजार समित्यांमधील दर (Kapus Bajar Bhav Today 18 Dec 2023)
सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कापूस दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत. आज (ता.18) बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7090 ते किमान 600 रुपये तर सरासरी 6015 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत कापसाला कमाल 6800 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (Kapus Bajar Bhav) बाजार समितीत कापसाला कमाल 6800 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत कापसाला कमाल 6400 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 6400 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत कापसाला कमाल 6910 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीत कापसाला कमाल 6725 ते किमान 6630 रुपये तर सरासरी 6680 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बाजार समितीत कापसाला कमाल 6950 ते किमान 6725 रुपये तर सरासरी 6838 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजार समितीत कापसाला कमाल 7020 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
मागील दोन हंगामापासून देशातील कापूस दरात मोठी घसरण सुरु आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि अन्य कापूस उत्पादक राज्यांमधील बाजार समित्यांमध्ये या हंगामात तर कापूस दर सात हजारांपर्यंत खाली घसरले आहेत. जो मागील दोन वर्षांपूर्वी कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने (Kapus Bajar Bhav) विकला जात होता. प्रति क्विंटलमागे झालेल्या तीन हजार रुपयांच्या घसरणीमुळे देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून रविवारी (ता.18) बैठक घेण्यात आली असून, त्यात किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे केंद्र कुठे सुरु केले जातील याबाबत कोणताही निर्णय जाहीर आलेला नाही.