Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण, आवकही मंदावली; वाचा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज (ता.१९) काहीशी घसरण नोंदवली गेली आहे. गेले काही दिवस राज्यात तीन ते चार बाजार समित्यांमध्ये कापूस दर 8000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती पाहायला मिळत होते. मात्र आज केवळ अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिकचा दर मिळाला आहे. परिणामी, कापूस दर घसरणीमुळे गेले दोन ते तीन दिवस बाजार समित्यांमध्ये कापूस विक्रीला आलेल्या शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये काहीशी आवकही (Kapus Bajar Bhav) मंदावलेली दिसून येत आहे.

आजचे राज्यातील कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 19 March 2024)

अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 88 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8194 ते किमान 7600 रुपये तर सरासरी 7897 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. देउळगाव राजा बाजार समितीत आज 1200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7950 ते किमान 7250 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7775 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज 55 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7700 ते किमान 7600 रुपये तर सरासरी 7650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अमरावती बाजार समितीत आज 90 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7575 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7287 रुपये प्रति क्विंटल, काटोल बाजार समितीत आज 185 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल, पारशिवनी बाजार समितीत आज 480 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सावनेर बाजार समितीत आज 3000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 ते किमान 7300 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल, जामनेर बाजार समितीत आज 73 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7200 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, हिंगणा बाजार समितीत आज 29 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दरवाढीमुळे व्यापाऱ्यांची चांदी

चालू वर्षीच्या रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा कापूस काहीसा भिजला होता. त्यातच कापसाचे दरही हमीभावापेक्षा कमी होते. ओल्या कापसामुळे भरीत भर शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कापूस दराने (Kapus Bajar Bhav) चांगला जोर पकडला. ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्या प्रति क्विंटलसाठी सरासरी 7000 ते 7900 रुपये प्रति क्विंटलदरम्यान दर मिळत आहे. मात्र, सध्याच्या घडीला काही शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने, काही निवडक शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा झाला आहे. व्यापाऱ्यांची मात्र दरवाढीमुळे चांदी झाली आहे.

error: Content is protected !!