हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये, मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दराच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. देऊळगाव राजा बाजार समिती आज कापसाची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अर्थात देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाचे दर (Kapus Bajar Bhav) स्थिर असून, अन्य ठिकाणी मात्र घसरण नोंदवली गेली आहे.
कुठे मिळतोय हमीभाव? (Kapus Bajar Bhav Today 20 Feb 2024)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Kapus Bajar Bhav) बाजार समितीत आज 9000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7310 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट येथे कापसाला कमाल 7370 रुपये दर मिळाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजार समितीत आज 4300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7220 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत आज 319 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7040 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6810 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2060 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7020 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 6950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
‘या’ ठिकाणी हमीभापेक्षा कमी दर
अकोला बाजार समितीत आज 32 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत आज 145 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6900 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीत आज 11 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6900 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री बाजार समितीत आज 250 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल, पारशिवनी बाजार समितीत आज 788 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6800 ते किमान 6550 रुपये तर सरासरी 6725 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
चढ-उतारामुळे संभ्रम
दरम्यान, मागील आठवड्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर काहीशे वाढलेले होते. ज्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आता त्यात पुन्हा काहीशी घसरण नोंदवली गेली आहे. कापसाला बाजारातील मागणी कायम आहे. मात्र, आज काही बाजार समित्यांमध्ये दरात घसरण झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये कापूस दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला आहे. अशात दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे कापूस ठेवावा की विक्री करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.