Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) घसरण पाहायला मिळाली आहे. कापसाला गेल्या पंधरवड्यात 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील कापूस दर सरासरी 7 हजार 200 ते 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. आज संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री बाजार समितीत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. फुलंब्री बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर (Kapus Bajar Bhav) हे 7620 पेक्षा कमी असल्याचे पाहायला मिळाले आहे.

आजचे राज्यातील कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 22 April 2024)

सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2120 क्विंटल आवक (Kapus Bajar Bhav) झाली असून, कमाल 7620 रुपये ते किमान 6000 रुपये तर सरासरी 7550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. देउळगाव राजा बाजार समितीत आज 300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7585 रुपये ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल, वर्धा बाजार समितीत आज 375 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 रुपये ते किमान 6850 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल, उमरेड बाजार समितीत आज 231 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अमरावती बाजार समितीत आज 70 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 रुपये ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7075 रुपये प्रति क्विंटल, काटोल बाजार समितीत आज 35 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7100 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7050 रुपये प्रति क्विंटल, पारशिवनी बाजार समितीत आज 249 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 रुपये ते किमान 6700 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दर स्थिर राहण्याची शक्यता

सध्याच्या घडीला बाजारात कापसाचे आवक मोठया प्रमाणात घटली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर (Kapus Bajar Bhav) नरमले असल्याने, त्याचा थेट परिणाम देशातील कापूस बाजारावर पाहायला मिळत आहे. सध्या कापसाचे दर प्रति क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी घसरले आहेत. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज सरासरी 7 हजार 200 ते 7 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!