Kapus Bajar Bhav : कापसाला 7605 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावाहून अधिक दर मिळाला. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कापूस दरवाढीबाबतच्या (Kapus Bajar Bhav) आशा पल्लवित झाल्या आहेत.

आजचे राज्यातील कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 23 Feb 2024)

देउळगाव राजा (बुलढाणा) बाजार समितीत आज 2423 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7605 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7375 रुपये प्रति क्विंटल, परभणी बाजार समितीत आज 2150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7485 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल, परभणी बाजार समितीत आज 2150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7485 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल, राळेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज 5500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल, बोरगावमंजू (अकोला) बाजार समितीत आज 155 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7306 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7153 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अकोला बाजार समितीत आज 97 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7180 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7090 रुपये प्रति क्विंटल, उमरेड (नागपूर) बाजार समितीत आज 529 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7160 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6850 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 94 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7050 ते किमान 6950 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, आष्टी (वर्धा) बाजार समितीत आज 439 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7050 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल, मारेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज 1270 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7050 ते किमान 6850 रुपये तर सरासरी 6950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मागील तीन ते चार महिन्यामध्ये कापसाची मागणी काहीशी घटली होती. परंतु, सध्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजार, देशातंर्गत जिनिंग व्यवसाय आणि कापड निर्मिती अशी चौफेर मागणी वाढली आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून घायकुतीला आलेल्या राज्यातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर (Kapus Bajar Bhav) मिळत असल्याने काही दिवसांपासून आपला कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, वाढलेल्या मागणीमुळे आता भविष्यात कापूस दरात आणखी वाढ होण्याची शक्यता, कापूस बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!