Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला कापूस विक्री करावा लागत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाची 1900 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7160 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे.

आजचे कापूस बाजार भाव (Kapus Bajar Bhav Today 26 December 2023)

नागपूर जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीत कापसाची 3500 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी राज्यातील कमाल 6750 ते किमान 6725 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत कापसाची 108 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी राज्यातील कमाल 7000 ते किमान 5850 रुपये तर सरासरी 6425 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत कापसाची 248 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी राज्यातील कमाल 6920 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत कापसाची 200 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी राज्यातील कमाल 6800 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हमीभावापेक्षा कमी दर

यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने देशातील कापूस उत्पादनात 8 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उत्पादन घटीचा परिणाम म्हणून दरवाढ होणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना कापूस सध्या कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला 7 हजार 20 रूपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. असे असतानाही राज्यातील एखादी, दुसरी बाजार समिती वगळता कोणत्याही कापसाला हमीभाव मिळत नाहीये. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीचा पर्याय अवलंबला आहे. आज राज्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावा लागला आहे.

error: Content is protected !!