Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) प्रति क्विंटलसाठी 8400 रुपयेपर्यंत वाढले होते. मात्र, चालू आठवड्यात राज्यातील कापूस दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. आज राज्यात परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत सर्वाधिक कमाल 7850 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अर्थात राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) जवळपास 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे.

आजचे कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 27 March 2023)

देउळगाव राजा (बुलढाणा) बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 400 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 7350 रुपये तर सरासरी 7675 रुपये प्रति क्विंटल, घाटंजी (यवतमाळ) बाजार समितीत आज 2200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7575 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल, वरोरा-माढेली (चंद्रपूर) बाजार समितीत आज 360 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7550 ते किमान 6100 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 70 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7075 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड व काटोल बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) संयुक्तपणे कमाल 7300 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल, जामनेर बाजार समितीत आज 42 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7200 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, सावनेर बाजार समितीत आज 2500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7200 ते किमान 7150 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल, यावल बाजार समितीत आज 320 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7190 ते किमान 6380 रुपये तर सरासरी 6760 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दर स्थिर राहणार

दरम्यान, देशातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) आठवडाभरापासून उतरणीला लागले आहेत. मात्र, असे असले तरी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत मिळणाऱ्या कापूस दरापेक्षा सध्याच्या घडीला मिळणारे कापूस दर चांगले असल्याने शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे. मात्र, राज्यातील तीन बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत कापूस दर 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. मात्र, कापसाला सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी 7 हजार 300 ते 7 हजार 700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी एक ते दोन आठवडे कायम राहू शकते, अशी शक्यता कापूस बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!