हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला नऊ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र नंतर त्यात घसरण होऊन अद्यापही कापूस दरात (Kapus Bajar Bhav) सुधारणा झालेली नाही. सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला अल्प दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आज अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक 7400 प्रति क्विंटलचा दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे.
आजचे कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 30 Dec 2023)
आज अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समितीमध्ये कापसाची (Kapus Bajar Bhav) 120 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7400 ते किमान 6999 रुपये तर सरासरी 7199 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये कापसाची 239 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7020 ते किमान 6949 रुपये तर सरासरी 6984 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समितीमध्ये कापसाची 1010 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7050 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाची 834 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7020 ते किमान 6830 रुपये तर सरासरी 6925 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे विविध पिकांचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील तुमच्या पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीमध्ये कापसाची 485 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6960 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा बाजार समितीमध्ये कापसाची 17 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6800 ते किमान 6450 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर बाजार समितीमध्ये कापसाची 105 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6800 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
मागणीत घट
मागील वर्षीच्या कापसाच्या गाठी जीनिंग मालकांकडे पडून असून, जवळपास निम्म्याच सूत गिरण्या त्याही कमी क्षमतेने चालू आहेत. त्यातच गुजरातेत मागणी नसल्याने राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाच्या उठावावर परिणाम झाला आहे. परिणामी मागणी नसल्याने राज्यातील कापूस दर घसरल्याचे कापूस व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र आता यामुळे राज्यातील खासगी व्यापाऱ्यांचे फावले आहे. केंद्र सरकारने कापसाला 7 हजार 20 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मागणी नसल्याचा फायदा घेत हे खासगी व्यापारी सहा ते साडेसहा हजार रुपये भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत.