Kapus Bajar Bhav : कापसाला आज 8200 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरातील (Kapus Bajar Bhav) वाढ सुरूच आहे. प्रामुख्याने सर्व स्तरातून मागणी वाढल्याने दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज देऊळगाव बाजार समितीत कापसाला उच्चांकी 8200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावापेक्षा सरासरी अधिकचा दर मिळत आहे. ज्यामुळे मागील काही दिवसांपासून नाराजीचा सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. तर ठेवायला जागा नसल्याने याआधी कापूस विक्री (Kapus Bajar Bhav) करून बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी राग पाहायला मिळत आहे.

कुठे मिळतोय 8000 रुपये दर? (Kapus Bajar Bhav Today 7 March 2024)

देउळगाव राजा बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 1700 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8200 ते किमान 7650 रुपये तर 7850 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. परभणी बाजार समितीत आज 1550 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8020 ते किमान 7800 रुपये तर 7950 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत आज 94 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 7400 रुपये तर 7700 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव

अकोला बाजार समितीत आज 87 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7900 ते किमान 7300 रुपये तर 7600 सरासरी रुपये प्रति क्विंटल, सिंदी(सेलू) बाजार समितीत आज 2550 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7825 ते किमान 6650 रुपये तर 7600 सरासरी रुपये प्रति क्विंटल, वरोरा-माढेली बाजार समितीत आज 360 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7600 ते किमान 6300 रुपये तर 7000 सरासरी रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 75 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 7400 रुपये तर 7450 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मारेगाव बाजार समितीत आज 778 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6700 रुपये तर 7100 सरासरी रुपये प्रति क्विंटल, उमरेड बाजार समितीत आज 378 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7400 ते किमान 7000 रुपये तर 7200 सरासरी रुपये प्रति क्विंटल, काटोल बाजार समितीत आज 155 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7300 ते किमान 6400 रुपये तर 7150 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

बाजारात मागणी कायम

दरम्यान, जागतिक पातळीवर यंदा सर्वच प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादनात घट नोंदवली गेली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी कायम राहून, कापूस दरात (Kapus Bajar Bhav) घसरण होण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही. सध्याच्या घडीला भारतामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर हमखास मिळतो आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रुई कापसाला साधारणपणे 9000 रुपये (भारतीय रुपयात) दर मिळत आहे. यात आगामी काळात आणखी वाढीचे संकेत कापूस बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!