Kapus Bajar Bhav : कापूस दर पुन्हा नरमले, 8 हजाराच्या आत घसरण; वाचा आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेने जोर धरला आहे. याउलट राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) पडझड सुरूच आहे. गेले काही दिवस 8 हजारांच्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली घसरले आहे. आज देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला राज्यातील सर्वाधिक कमाल 8000 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7850 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव? (Kapus Bajar Bhav Today 8 April 2024)

राळेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज 4900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7750 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7625 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus Bajar Bhav) मिळाला आहे. मारेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज 477 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7750 रुपये ते किमान 6950 रुपये तर सरासरी 7350 रुपये प्रति क्विंटल, वरोरा (यवतमाळ) बाजार समितीत आज 777 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7701 रुपये ते किमान 6000 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

वरोरा-खांबाडा (चंद्रपूर) बाजार समितीत आज 221 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7650 रुपये ते किमान 6500 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 55 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, पारशिवनी बाजार समितीत आज 676 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7275 रुपये ते किमान 6850 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दराची पुन्हा उलटी गिनती

दरम्यान, यंदा संपूर्ण हंगामात कापसाचे भाव हे हमीभावापेक्षा कमी राहिले. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीत कापसाचे भाव हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भाव 8300 ते 8500 या पातळीपर्यंत पोहचले. मात्र, सध्याच्या घडीला कापूस दर पुन्हा माघारी फिरले असून, सध्या कापसाला 8 हजाराच्या आत दर मिळत आहे. अर्थात केवळ दीड महिना कापसाचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. मात्र, त्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केलेला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना या भाववाढीचा फायदा झालाच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!