Kapus Bajar Bhav : कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे! आदेशानंतरही हमीभाव नाहीच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, असे असूनही सध्या राज्यात हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला कापूस व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने 2023-24 च्या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत 7020 रूपये, तर मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत 6620 रूपये प्रति क्विंटल निर्धारित केली आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांना हमीभापेक्षा कमी दराने कापूस विक्री (Kapus Bajar Bhav) करावा लागतो आहे.

आजचे राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav Today 8 Feb 2024)

बोरगावमंजू (अकोला) बाजार समितीत आज कापसाची 158 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7195 रुपये ते किमान 6700 रुपये तर सरासरी 6947 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत आज कापसाची 105 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 रुपये ते किमान 6730 रुपये तर सरासरी 6865 रुपये, देउळगाव राजा (बुलढाणा) बाजार समितीत आज कापसाची 4195 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6950 रुपये ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6800 रुपये, मारेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज कापसाची 892 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 रुपये ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6750 रुपये, फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) बाजार समितीत आज कापसाची 162 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6750 रुपये ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6700 रुपये, हिमायतनगर (नांदेड) बाजार समितीत आज कापसाची 146 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6550 रुपये ते किमान 6450 रुपये तर सरासरी 6500 रुपये, काटोल (नागपूर) बाजार समितीत आज कापसाची 324 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6700 रुपये ते किमान 5400 रुपये तर सरासरी 6650 रुपये दर मिळाला आहे.

फडवणीसांच्या जिल्ह्यातही कमी दर

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असले तरी त्यांच्याच नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत शेतकऱ्यांकडून व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने, त्यांनी साठवणुकीचा पर्याय अवलंबला आहे. मात्र, कापूस घरात साठवून तरी किती दिवस ठेवणार? अशी खंत शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. साठवणुकीमुळे घरात कापसाला बारीक कीड लागत असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांना त्वचारोग, ॲलर्जी अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते. असेही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!