Kapus Bajar Bhav : कापसाचे दर रेंगाळलेलेच; पहा आजचे राज्यातील भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापसाचे सरासरी दर (Kapus Bajar Bhav) हमीभावाच्या खालीच रेंगाळलेले आहेत. मुख्यत्वे करून कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी हुकुमी एक्का असलेले पीक म्हणून ओळखले जाते. मात्र चालू वर्षीच्या हंगामात या दोन्ही पिकांच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. आज राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समिती वगळता अन्य सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमीच दर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) हे जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील आजचे कापूस बाजारभाव (Kapus Bajar Bhav Today 8 Jan 2024)

हिंगणघाट बाजार समितीत आज कापसाची (Kapus Bajar Bhav) 9810 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7195 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत आज कापसाची 1010 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7070 ते किमान 6550 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत आज कापसाची 644 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7010 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत आज कापसाची 1056 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7001 ते किमान 6950 रुपये तर सरासरी 6961 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे कापसाचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. चंद्रपूर भद्रावती बाजार समितीत आज कापसाची (Kapus Bajar Bhav) 698 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6970 ते किमान 6730 रुपये तर सरासरी 6830 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज कापसाची 31 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6949 ते किमान 6949 रुपये तर सरासरी 6949 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील आष्टी बाजार समितीत आज कापसाची 438 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6650 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीत आज कापसाची 456 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6850 ते किमान 6700 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर बाजार समितीत आज कापसाची 231 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6750 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हुकुमी एक्का फोल ठरला

कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांचे हुकुमी एक्का असलेले पीक असल्याने, शेतकरी या पिकांची साठवणूक करून ठेवतात. बाजारभावातील चढ-उतार पाहून शेतकऱ्यांकडून या पिकांची बाजारात विक्री केली जाते. मागील हंगामासह चालू वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे. त्यांना मोठ्या पश्चातापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता घरात ठेवावे तर दर घसरणीची भीती आणि विक्री करावी तर तुंटपुज्या दराने करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

error: Content is protected !!