Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार? पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने देशातंर्गत बाजारासह, जिनींग उद्योगातून मागणी वाढल्याने कापूस दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अकोट या बाजार समितीत कापसाला 8280 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. तर देउळगाव राजा, अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीतही कापसाचे दर हे 8000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती नोंदवले गेले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला कापूस विक्री केला. त्यानंतर आता भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना या कापूस दरवाढीचा (Kapus Bajar Bhav) फायदा होत असल्याची ओरड काही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कुठे मिळतोय 8000 दर? (Kapus Bajar Bhav Today 9 March 2024)

अकोट बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) आज 3950 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8280 ते किमान 7500 रुपये तर सरासरी 8200 रुपये प्रति क्विंटल, देउळगाव राजा बाजार समितीत आज 1600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8025 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7900 रुपये प्रति क्विंटल, अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत आज 88 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 7300 रुपये तर सरासरी 7650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वरील तीनही बाजार समित्यांमध्ये उच्चांकी दर तर आष्टी (वर्धा) – 7400, पारशिवनी – 7125, यावल – 7180, हिमायतनगर- 7200, फुलंब्री – 7000 या बाजार समित्यांमध्ये कमाल 7500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर मिळाला आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव

हिंगणघाट बाजार समितीत आज 6000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7915 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज 89 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 7380 रुपये तर सरासरी 7590 रुपये प्रति क्विंटल, मारेगाव बाजार समितीत आज 1069 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7600 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उमरेड बाजार समितीत आज 353 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7510 ते किमान 7100 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 85 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, भद्रावती बाजार समितीत आज 56 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 7050 रुपये तर सरासरी 7275 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांना साठवणुकीचा फायदा

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यांपासून दर (Kapus Bajar Bhav) घसरणीचा मोठा फटका सहन केलाय. मात्र, आता सर्वच बाजार समित्यांमध्ये कापूस दर काहीसे वाढलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने उच्च प्रतीच्या कापसाला 7020 रुपये तर मध्यम प्रतीच्या कापसाला 6620 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता. अशा सर्वच शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. राज्यात सर्वच ठिकाणी कापसाला चांगला दर मिळत असल्याने, बाजार समित्यांमध्ये विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!