Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून कापूस बाजारात (Kapus Bajar Bhav) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. घटलेली आवक आणि त्या तुलनेत बाजारात मागणी वाढली असल्याने सध्या कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहेत. आज राज्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला सर्वाधिक कमाल 8000 रुपये प्रति क्विंटल इतका दर (Kapus Bajar Bhav) मिळाला.

सर्वाधिक दर कुठे? (Kapus Bajar Bhav In Maharashtra)

बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत (Kapus Bajar Bhav) 980 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 7100 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत 3100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7850 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 7750 रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समितीत 93 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 7100 रुपये तर सरासरी 7450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अकोला बाजार समितीत 283 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 6550 रुपये तर सरासरी 7175 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी(सेलू) बाजार समितीत 2625 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7625 ते किमान 6700 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजार समितीत 5150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7580 ते किमान 6650 रुपये तर सरासरी 7450 रुपये प्रति क्विंटल, वरोरा-माढेली बाजार समितीत 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7501 ते किमान 6300 रुपये तर सरासरी 6850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कमी दर मिळालेले मार्केट?

नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत 383 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7350 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत 85 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7300 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7250 रुपये प्रति क्विंटल, संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री बाजार समितीत 297 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7200 ते किमान 6700 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल, जळगाव जिल्ह्यातील यावल बाजार समितीत 43 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7150 ते किमान 6390 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

टप्प्याटप्प्याने विक्री करावी

गेले काही महिने कापूस उत्पादकांनी कमी दराचा फटका सहन केला. मात्र आता हळूहळू कापसाचे दर (Kapus Bajar Bhav) पूर्वपदावर येत आहेत. इतकेच नाही तर आगामी काळात कापूस दरात आणखीनच तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही साठवून ठेवलेला कापूस असेल. तर बाजार भावाचा अंदाज घेऊन कापूस विक्री करावा. आपल्याकडे कमी-अधिक कापूस असेल तर तो टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घ्यावा. जेणेकरून अधिकचा दर मिळण्यास मदत होईल. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर 7500 ते 8000 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिरावले आहेत.

error: Content is protected !!