Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला (Kapus Bajar Bhav) किमान आधारभूत किंमतीच्या बरोबरीने दर मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात विक्री करावा? की साठवून ठेवावा? अशी मनस्थितीत शेतकऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता. मात्र दरातील घसरणीमुळे त्यांना नुकसानच झाले होते.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला 6800 ते 7200 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत आहे. त्यातच यावर्षी कमी पाऊस आणि एलनिनोच्या प्रभावामुळे देशातील कापूस उत्पादनात मोठी घट होणार असल्याने येत्या काळात कापसाचा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील बुधवारचे (ता.29) कापूस दर पुढीलप्रमाणे आहेत.

कापसाचे भाव (Kapus Bajar Bhav 30 November 2023)

बुधवारी वर्धा येथील बाजार समितीत कापसाला कमाल 7200 ते किमान 7025 तर सरासरी 7100 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत कापसाला कमाल 7100 ते किमान 7025 तर सरासरी 7050 प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत कमाल 7151 ते किमान 6651 तर सरासरी 7050 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील कटोल बाजार समितीत कमाल 7050 ते किमान 6900 तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर बाजार समिती कमाल 7010 ते किमान 6810 तर सरासरी 6930 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजार समितीत कापसाला कमाल 7030 ते किमान 6900 तर सरासरी 6950 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीत कमाल 6900 ते किमान 6000 तर सरासरी 6450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

किमान आधारभूत किंमत किती?

केंद्र सरकारने 2023-24 या वर्षासाठी मध्यम प्रतीच्या कापसाला 6620 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे. जी मागील वर्षी 6080 रुपये प्रति क्विंटल निर्धारित करण्यात आली होती. तर यावर्षी केंद्र सरकारने उच्च गुणवत्तेच्या कापसासाठी 7020 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे. जी मागील वर्षी 6380 रुपये प्रति क्विंटल निर्धारित करण्यात आली होती.

error: Content is protected !!