Karnataka Farmers : कर्नाटकात शेतकरी आक्रमक; मिरचीला योग्य भाव नसल्याने पेटवल्या गाड्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांना (Karnataka Farmers) मिरची पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भडका पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी बाजार समितीत मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरची पिकाच्या दर घसरणीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील शेतकऱ्यांनी दगडफेक (Karnataka Farmers) केल्याचे वृत्त आहे.

का झाले शेतकरी आक्रमक? (Karnataka Farmers Aggressive Chilli Price Dropped)

या संपूर्ण घटनेबाबत ब्यादगीचे आमदार बासवराज नीलप्पा शिवन्नानवर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की, “मागील आठवड्यात मिरचीला कर्नाटकातील (Karnataka Farmers) बाजार समित्यांमध्ये 20 ते 25 हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला होता. मात्र,चालू आठवड्यात त्यात थेट 10 ते 15 हजार रुपये घसरण झाली आहे. ब्यादगी बाजार समितीत केवळ कर्नाटकच नाही तर शेजारील आंध्रप्रदेश राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरची विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे मिरची पिकाला योग्य दर मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी एकजूट होत आपला रोष व्यक्त केला आहे.

मिरचीचे दर निम्म्याने घसरले

दरम्यान, शेतकऱ्यांनी मिरची दर जवळपास निम्म्याने घसरल्याने हे पाऊल उचलले आहे. बाजार समितीत उभ्या असलेल्या जवळपास तीन गाड्या शेतकऱ्यांनी (Karnataka Farmers) पेटवल्याचे संगितले जात आहे. तसेच जमावाला शांत करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता केवळ कांदा, सोयाबीनच नाही तर त्या-त्या भागांमध्ये संबंधित पिकांच्या दर घसरणीचा सामना शेतकरी करत असल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.

एपीएमसी कार्यालयाचीही तोडफोड

बाजार समितीच्या आवारात गाड्या पेटवल्यानंतर शेतकऱ्यांनी एपीएमसी कार्यालयाची देखील तोडफोड केली आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी कार्यालयावर दगडफेक करत काचा फोडल्या आहेत. ब्यादगी बाजार समिती हजारो शेतकरी आपली मिरची विक्री करण्यासाठी, मात्र सध्या पिकासाठी कष्ट घेऊन आणि हालअपेष्टा सहन करूनही अपेक्षित दर मिळत नाहीये. मागील आठवड्यात असलेल्या दरामध्ये मिरची खरेदी करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. असे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!