Kartar 4036 Tractor : करतार 4036 शेतकऱ्यासांठीचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील शेतमालाची शेतकऱ्यांनी विक्री (Kartar 4036 Tractor) केली असून, रब्बी हंगामातील ही काही सध्या माल बाजारात विक्री होतो आहे. त्यांनतर आता आर्थिक जमवाजमाव करून तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा चांगला ट्रॅक्टर घेण्याचे निश्चित केले असेल. तर करतार कंपनीचा करतार 4036 हा ट्रॅक्टर (Kartar 4036 Tractor) एक उत्तम ट्रॅक्टर म्हणून समोर आला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर शक्तिशाली असून, किर्लोस्कर इंजिनसह येतो. त्यामुळे जुनी परंपरा असलेल्या किलोस्कर इंजिनमुळे हा एक विश्वासार्ह ट्रॅक्टर ठरतो. या ट्रॅक्टरबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत…

करतार 4036 ट्रॅक्टरबद्दल (Kartar 4036 Tractor For Farmers)

करतार 4036 ट्रॅक्टरला (Kartar 4036 Tractor) कंपनीने 2430 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरचे इंजिन दिले आहे. हे इंजिन 40 HP पावरसह 150 एनएम टॉर्कची निर्मिती करते. या ट्रॅक्टरला कंपनीने ड्राय टाईप एयर फिल्टर दिला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 34.06 HP पीटीओ पावरसह 2200 RPM ची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरला कंपनीने 55 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही 1800 किलोग्रॅम इतकी असून, या ट्रॅक्टरचे एकूण वजन हे 1955 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला 3765 एमएम लांबी, 1740 एमएम रुंदी आणि 2015 एमएम व्हीलबेससह तयार केले आहे. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला 420 एमएम इतका ग्राउंड क्लीयरेंस दिला आहे.

करतार 4036 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • कंपनीने या ट्रॅक्टरला Manual स्टीयरिंग दिलेले आहे.
  • या ट्रॅक्टरला 8 Forward + 2 Reverse गियर देण्यात आलेले आहे.
  • तसेच करतार कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला सिंगल टाईप क्लच पाहायला मिळतो.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 31.97 किमी प्रति तास तर मागील बाजूला 13.90 किमी प्रति तास इतका वेग दिला आहे.
  • करतार कंपनीचा हा ट्रॅक्टर लाईव्ह पावर टेकऑफ सह येतो.
  • याशिवाय ट्रॅक्टर 2 WD ड्राइवसह उपलब्ध करण्यात आला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 6.50×16 टायर तर मागील बाजूस 13.6 X 28 आकाराचे टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

कंपनीने या ट्रॅक्टर शोरूम किंमत 6.40 लाख रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे देशातील वेगवगेळ्या ठिकाणी या ट्रॅक्टर ऑन रोड प्राईस वेगवेगळी असू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरला २ वर्षांची वारंटी दिलेली आहे. त्यामुळे अल्प किमतीत हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी दमदार ट्रॅक्टर ठरतो.

error: Content is protected !!