Karvand Farming : करवंदापासून गुलाबी चेरीची निर्मिती; कंपनी थेट शेतातून विकत घेते फळं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. यापासून ते अधिकाधिक उत्पन्न मिळवतात. शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असताना जोखीम घेत असतात. मात्र हीच जोखीम भविष्यात कुठे तरी यशाच्या शोधात आहे. अशीच एक सक्सेस स्टोरी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू यांच्याबाबत आहे. मनरेगा या योजनेच्या अंतर्गत साधू यांनी करवंदाची शेती केली आहे. या फळाच्या पानाला गुलाबी रंगाची चेरी येते. त्या पिकाला मार्केटदर पण चांगला आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शेती फारशी खर्चिक नाही. कमी पाणी आणि फवारणीची फारशी गरज नसल्याने ही शेती परवडणारी आहे. करवंदाचे झाड लावल्यानंतर तीन वर्षांनंतर फळे यायला सुरुवात होतात. तसेच पुढील ३० वर्षांपर्यंत कसलीही चिंता करू नये. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत करवंद फळ झाडावरून काढले जात असून ते शेतातून खरेदी करून महाराष्ट्रातील आणि देशातील काही कंपन्यांमध्ये विक्री केली जाते.

या ठिकाणच्या कंपन्या करवंद फळाची शेतीतून करतात खरेदी

दिल्ली, जळगाव, मुक्ताईनगर, गुजरात येथीप काही कंपन्या करवंद हे फळ शेतातून खरेदी करून घेऊन जातात. या पिकाची लागवड करण्यासाठी आंतरपिकाची देखील लागवड केली आहे. साधू यांनी करवंद लागवडीपासून दोन वर्षापर्यंत मधल्या मोकळ्या जागेत सोयाबीन, गहू, हरभरा हे आंतरपीक घेत होते. यापासून सुध्दा त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नातून साधू यांनी शेतात शेततळे उभारले याचा फायदा साधू यांना होत आहे.

मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ

शेतात विहीर घेऊन शेततळे देखील बांधले होते. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे. सिंचनाची सुविधा ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधले आहे.

error: Content is protected !!