Khandkari Farmers : खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क; राज्य सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना (Khandkari Farmers) शेती महामंडळाकडून सुमारे 38 हजार 361 एकर जमीन देण्यात आली होती. या जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 हा शेरा आता भोगवटादार वर्ग-1 असा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग करण्याच्या या सुधारणेमुळे 6 जिल्ह्यांतील, 10 तालुक्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या 38 हजार 361 एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-1 असा होणार आहे. याचा सुमारे 2 हजार 600 खंडकरी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सुधारणेमुळे दीर्घ कालावधीपासूनची खंडकरी शेतकऱ्यांची मागणी पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर कर्ज घेणे, खरेदी-विक्रीचे व्यवहार आदी सर्व मालकी अधिकार प्राप्त झाले आहेत.

सार्वजनिक प्रयोजनांसाठीही मंजुरी (Khandkari Farmers In Maharashtra)

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकाराने वाटप करण्यात आलेल्या होत्या. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी वर्ग-1 च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या, त्या परत मिळताना त्यांना वर्ग-2 म्हणून मिळाल्याने या जमिनींचा धारणा प्रकार वर्ग-1 करुन मिळण्याबाबत खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची मागणी होती. या खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन मंत्रिमंडळ बैठकीत मांडलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. असेही ते म्हणाले आहे. तसेच शेती महामंडळाची जमीन मिळण्याबाबत वेगवगळ्या सार्वजनिक प्रयोजनांसाठी ग्रामपंचायतींकडून मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करुन देता येणार आहे. असेही ते म्हणाले आहे.

error: Content is protected !!