Kharif Season : पावसामुळे पेरण्यांना वेग! खानदेशामध्ये 85 टक्के पेरण्या पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kharif Season : राज्यात बऱ्याच दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे मागच्या काही दिवसापासून आगमन झाले आहे. जून महिन्यामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीनंतर काही दिवसातच पावसाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची देखील पेरणीसाठी लगबग सुरू झाली. दरम्यान, खानदेशामध्ये सहा जुलै नंतर पावसाने हजेरी लावल्याने त्या ठिकाणच्या रखडलेल्या पेरण्या आता पूर्ण झाल्याआहेत. पेरणीची आकडेवारी देखील वाढली आहे.

खानदेशामध्ये जवळपास 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर धुळे, जळगाव व नंदुरबार मध्ये सुमारे 14 लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येते का काही अशी चिंता होती मात्र दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलं नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पेरणी उशिरा झाल्या असल्याने कोरडवाहू कापूस लागवड कमी असून कापूस लागवड सुमारे सहा लाख हेक्टर वर खानदेशात झाली आहे. (Kharif Season)

दरवर्षी खानदेशात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होते. मात्र यावर्षी खानदेशामध्ये कमी कापूस लागवड झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उडीद आणि मुगाची पेरणी देखील कमी झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड टाळून सोयाबीन पेरणीला यावेळी प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे देखील सांगण्यात येत आहे

तुम्हाला जर घराबाहेर पडायच्या आधी हवामान अंदाज चेक करायचा असेल तर तुम्ही आता प्लेस्टोर वरती जा त्या ठिकाणी hello krushi असे सर्च करा आणि आपले हॅलो कृषी चे अॅप इंस्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यावरती तुम्ही त्यामध्ये दररोजचा हवामान अंदाज पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!