Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा? Kharip Pik Vima

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून सरकार कडून मिळणाऱ्या सर्व योजनांचा घरबसल्या लाभ घेता येतोय. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, यांसारख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

जळगांव नगर या जिल्ह्यासाठी सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहे. तर कापूस व अन्य पिकांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वच पिकांच्या संदर्भात विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे. तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून कापसाचा दावा मात्र अमान्य करण्यात आला आहे.

सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यात कंपन्यांकडून आक्षेप घेण्यात आले नव्हते. मात्र यादी अंतिम होण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत. शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये लवकरच नुकसान भरपाईचे वितरण (Kharip Pik Vima) केले जाणार आहे. बीड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यासाठी विभागीय स्तरावर झालेल्या सुनावणीनंतर कंपन्यांनी राज्य स्तरावर कृषी विभागाकडे आक्षेप नोंदवला आहे.

error: Content is protected !!