खेकडा पालन : खेकडापालन करून तुम्ही कमावू शकताय बक्कळ पैसे; कस ते घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खेकडा पालन : शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील मिळतो. सध्या बरेच शेतकरी आपल्याला खेकडापालन करताना दिसून येतात. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो म्हाणून या व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे. आजच्या लेखामध्ये आपण खेकडा पालनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जुन्नर (जि. पुणे) येथील विजय घोगरे हे खेकडा पालन व्यवसाय करीत आहेत. कमी खर्चामध्ये चालणारा हा व्यवसाय आहे. (Khekda Palan Mahiti)

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या व्यसायासाठी जागा कशी निवडावी?

खेकडापालन व्यवसायासाठी खाली जागा ही खडकाळ मुरमाड असावी. श्री. घोगरे यांनी २० बाय २५ फूट आकाराचा हौद यासाठी बांधला आहे.
हौदाला खालील बाजूने स्टील टाकून सिमेंट काँक्रीट करून बांधून घेतले आहे. त्यामुळे हौदातील पाणी खाली मुरत नाही तसेच खेकडे खाली बिळे पाडत नाही. आतील बाजूच्या भिंतीला टाईल्स लावलेत जेणेकरून खेकडा भिंतीवरून बाहेर येत नाहीत. हौद बांधल्यानंतर त्यात खाली घोगरे यांनी एक ते दीड फूट खोल मातीचा मात्र थर दिला आहे. त्यामुळे खेकड्यांना नैसर्गिक वातावरण निर्माण होते. हौदाची उंची सहा फूट आहे. त्यामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाण्याचे प्रमाण ठेवले जाते. हौदातील पाणी तीन ते चार दिवसांनी बदलले जाते. श्री. घोगरे यांच्याकडे प्रामुख्याने काळ्या पाठीच्या खेकड्यांचे पालन केले जाते. काळ्या पाठीच्या खेकड्यांसाठी खारट पाणी चालत नाही. यासाठी गोड्या पाण्यातच या खेकड्यांचे पालन केले जाते. (Latest Marathi News)

५० किलो खेकड्यांपासून सुरुवात (खेकडा पालन)

सुरुवातीला ५० किलो खेकडे हौदामध्ये सोडले. एका खेकड्याच्या मादीला जवळपास चारशे ते पाचशे पिल्ले होतात. त्यामुळे खेकडे पालन करताना मादींची संख्या जास्त असावी, असे घोगरे यांचे म्हणणे आहे. विक्री करताना नरांची विक्री करावी जेणेकरून आपल्याकडे मादींची संख्या जास्त राहील व उत्पादन वाढेल.

योजनेला अर्ज करण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला खेकडा पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी घरी बसूनही लाभार्थी बनू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करावं लागेल. यानंतर सरकारी योजना या विभागात जाऊन सोप्प्या पद्धतीने योजनेसाठी अर्ज करावा. हॅलो कृषी अँप च्या मदतीने तुम्ही तुमचा सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा सहज डाउनलोड करू शकता. तसेच जमीन मोजणी, रोजचे बाजारभाव पाहणे, शेतकरी दुकान आदी सेवांचा मोफत लाभ घेऊ शकता. तेव्हा आज Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

खाद्याचे नियोजन कसे करावे?

आपल्या घरातील उरलेले अन्न भात, भाकरी खेकड्यांसाठी खेकड्यांना खाद्य म्हणून टाकले तरी चालते. खेकड्यांना खाण्यासाठी तांदूळही टाकले जाते तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खेकड्यांना खाण्यासाठी मासे टाकले जातात. खेकड्यांना खाद्य हे दिवसातून एक वेळा तेही संध्याकाळच्या वेळेसच टाकले जाते. कारण ते दिवसातून संध्याकाळच्या वेळेसच मोठ्या प्रमाणात वर येतात.

विक्रीला कधी येतात?

खेकडे साधारणतः एक ते दीड वर्षानंतर विक्रीसाठी तयार होतात. दीड वर्षानंतर खेकड्यांचे वजन २०० ते २५० ग्रॅम इतके होते. त्यानंतर खेकड्यांची विक्री केल्यास फायदा होतो.

नर व मादी कशी ओळखावी?

नराचे पोट हे लहान असते तर मादीचे पोट मोठे असते. यावरून आपल्याला नर किंवा मादी ओळखता येते.

खेकडे कसे पकडले जातात?

घोगरे यांनी खेकडे पकडण्यासाठी घरच्या घरी पिंजरा तयार केला आहे. हा पिंजरा संध्याकाळच्या वेळेस हौदात टाकला जातो. या पिंजर्‍यात खाद्य टाकले जाते. हे खाद्य खाण्यासाठी खेकडे आले की ते पिंजर्‍यामध्ये अडकतात. सकाळी त्यांना त्यातून बाहेर काढले जाते आणि विक्रीसाठी नेले जाते एका पिंजर्‍यामध्ये पाच ते सहा किलो खेकडे मिळतात पकडले जातात.

खर्च आणि उत्पन्न किती?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी घोगरे यांना सुरुवातीला दोन लाख रुपये खर्च आला. दिवसाला चार ते पाच किलो खेकड्यांची विक्री ते करतात एखादा सण असेल तर खेकड्यांची विक्री कमी होते. ३५० रुपये प्रति किलो दराने या खेकड्यांची विक्री करतात. हॉटेल व्यवसायिकांना जास्त प्रमाणात खेकडे पाहिजे असतात तेव्हा त्यांच्यासाठी ते ३२५/- दराने विक्री करतात.

कमी भांडवलात आपल्याला जर जोड व्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर खेकडे पालन हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आपल्या आजूबाजूचे मार्केट, मागणी, दर या गोष्टी पाहून हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे. खेकडेपालन व्यवसायातून एक प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून खेकडे पालन हा एक चांगला जोडधंदा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

error: Content is protected !!