Khodwa Sugarcane Management Machine: खोडवा ऊस व्यवस्थापन सुधारित यंत्र करेल श्रम आणि मजुरीत बचत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Khodwa Sugarcane Management Machine: कृषी विज्ञान केंद्र दहीगावने (केव्हीके) ऊस खोडव्याचे व्यवस्थापन (Sugarcane Management) करणाऱ्या ट्रॅक्चटरचलित सुधारित यंत्राच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे.

सामान्यता लागवडीच्या उसाकडे खोडवा उसापेक्षा जास्त काटेकोर लक्ष दिले जाते. कारण खोडवा उसाच्या सुरुवातीच्या मुख्य कामांमध्ये मजूरबळ, वेळही खूप लागतो. त्यामुळे खोडवा उसाच्या उत्पादकतेत घट येते. दहिगाव- ने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आणि अभियांत्रिकी विभागाने त्यादृष्टीने खोडवा व्यवस्थापनात (Khodwa Sugarcane Management Machine) यांत्रिकीकरणाबाबत जागृती करण्याचे ठरविले.

असे तयार झाले ट्रॅक्टरचलित यंत्र (Agriculture Technology)

केव्हीकेच्या अभियांत्रिकी विभागाने स्थानिक कारागिरांची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या ऊस व्यवस्थापनाच्या पद्धती लक्षात घेऊन प्रचलित ट्रॅक्टरचलित खोडवा व्यवस्थापन यंत्रात सुधारणा केल्या. त्यातून यंत्राचे ‘मॉडिफाइड व्हर्जन’ तयार झाले.

हे सुद्धा वाचा शेतातील 50 कामे एकच मशीन करणार; काढणी पासून खड्डा काढण्यापर्यंत सगळं काही झालं सोप्प  

तंत्रज्ञानाचा झाला प्रसार

सन २०१७-१८ च्या दरम्यान केव्हीकेने त्यांच्या सुमारे सहा एकर ऊस क्षेत्रात तसेच दहा शेतकऱ्यांच्या शेतात यंत्राची प्रात्यक्षिके घेण्यास सुरुवात केली. या प्रयोगाचे निष्कर्ष चांगले दिसू लागले. त्यानंतर या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली.

दरवर्षी दहा शेतकरी असे करीत एकेवर्षी तर 60 या प्रकारे ही संख्या आता हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नगर, बीड, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांपर्यंत या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे. त्यासाठी शेतीशाळा, बांधावरील बैठकीतून अभियान राबवले.

काय आहे खोडवा ऊस व्यवस्थापन यंत्राची वैशिष्ट्ये (Khodwa Sugarcane Management Machine)

  • ट्रॅक्टरचलित यंत्र 1.17 मीटर रुंद, 1.40 मीटर उंच, तर 0.90 मीटर लांब आकाराचे आहे.
  • ‘लोखंडी ॲगल’चा साचा वापरून यंत्रनिर्मिती. यंत्राचे पाते, गिअरबॉक्स, रिजर या भागांमध्ये बदल केले आहे.
  • बगला फोडणी (उसाची जुनी कमकुवत मुळे तोडणी व आंतरमशागत) व्यवस्थित करता यावी यासाठी यंत्राच्या फ्रेमच्या दोन्ही बाजूंना ‘रिजर’ बसवले आहेत. शेतकऱ्यांच्या लागवड पद्धती लक्षात घेऊन रिजरची लांबी, रुंदी व उंची ‘ॲडजेस्टेबल’ केली आहे.
  • यंत्राच्‍या मधोमध खालील भागात बुडखे छाटणीसाठी जमिनीलगत फिरणारे पाते बसवले आहेत.
  • प्रचलित यंत्रात चार पाती होती. ती आठ बसविली आहेत. त्यामुळे छाटणीत गुंतागुंत न होता हे काम चांगल्या प्रकारे होते. पूर्वी पाते फिरण्याचा वेग 175 आरपीएम होता. गिअरबॉक्समध्ये बदल करून तो 350 आरपीएम केला आहे.
  • ‘फ्रेम’वर खत पेटी बसवली आहे. यामुळे बुडखे छाटणी, बगला फोडणी करतानाच खताचा बेसल डोस उसाच्या मुळांजवळ देणे म्हणजेच तीन कामे एकाचवेळी करणे शक्य होते.

पाचट कुजवण्याची प्रक्रिया (sugarcane trash compost)

पाचट कुजण्यासाठी ते सरीत दाबावे. एकरी चार लिटर वेस्ट डी-कंपोझर, शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट (दोन बॅग्ज), पन्नास किलो युरियाची पाचटावर प्रक्रिया करावी. सुमारे तीन महिन्यांत पाचट कुजण्याची प्रक्रिया होते.

त्यातून एकरी 3 ते 4 टन सेंद्रिय खत तयार होते. त्याच्या सातत्यपूर्ण वापरातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. पाचट सरीत दाबून ‘मल्चिंग’ केल्यास तीन ते चार वेळा द्यावे लागणाऱ्या पाण्याच्या हप्त्यांमध्येही बचत होत असल्याचे केव्हीकेचे म्हणणे आहे.

लागवडीच्या ऊस तोडणीनंतर पाचट जाळणे जमिनीसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे खोडवा उसाचे शास्त्रीयदृष्ट्या प्रभावी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा विचार करून यंत्रात (Khodwa Sugarcane Management Machine) सुधारणा केल्या.

यंत्राचे तुलनात्मक फायदे (Khodwa Sugarcane Management Machine)

पारंपरिक पद्धतीने खोडवा ऊस व्यवस्थापन करण्यासाठी प्रति एकर सुमारे 12 मजूर लागतात.त्यासाठी प्रति मजूर तीनशे रुपये पकडल्यास 3600 एवढा खर्च येतो. यंत्राद्वारे एकरी दोन तासांत हे काम होऊन डिझेल व एका व्यक्तीचा मजूरखर्च पकडून सुमारे 1200 रुपये खर्च येतो. यातून मजूर टंचाईवर मात करण्यासह आर्थिक बचत होते. यंत्राद्वारे काम केल्याने बेटाला फुटव्यांची संख्या पाच ते सातने वाढू शकते. गरजेनुसार खताची मात्रा वेळेवर मिळत असल्याने फुटवे अधिक बळकट येतात. त्यातून एकरी चार ते पाच टन उत्पादन वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे (Khodwa Sugarcane Management Machine).

error: Content is protected !!