Kisan Credit Card : केसीसीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना 5.50 लाख कोटींचा कर्जनिधी मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 या वर्षभरात आतापर्यंत केंद्र सरकारकडून 451.98 लाख नवीन किसान क्रेड‍िट कार्ड (Kisan Credit Card) मंजूर करण्यात आले आहे. या सर्व कार्डचे क्रेड‍िट ल‍िम‍िट हे 5 लाख 51 हजार 101 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतीसाठी 5.50 लाख कोटी रुपये दिले जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून (Kisan Credit Card) समोर आली आहे.

केंद्र सरकारने माफक व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने शेतीसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पशुपालन आणि मस्त्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 2 लाखांपर्यंचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने कोरोना काळात 2.5 कोटी शेतकऱ्यांना क‍िसान क्रेड‍िट कार्ड वाटपाचे लक्ष्य निर्धारित केले होते. हे लक्ष्य केंद्र सरकारकडून 15 ऑक्टोबर 2021 पर्यंतच पूर्ण करण्यात आपले होते. त्यासाठी केंद्र सरकारकडून 2 लाख कोटींच्या क्रेड‍िट ल‍िम‍िटचे कार्ड बनवण्याचे निश्चित करण्यात आले होते. असेही कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

21.55 लाख कोटींची तरतूद (Kisan Credit Card 5.50 Lakh Crores Loan)

शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागू नये. आणि सावकारांच्या अधिक व्याजाच्या विळख्यात देशातील शेतकरी गुंतू नये. यासाठी वर्ष 2022-23 पर्यंत कृषी कर्जासाठीची तरतूद 21.55 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. असेही या आकडेवारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या केंद्र सरकारकडून देशभरातील पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात येत आहे. यासाठी पशुपालन विभाग आणि केंद्रीय कृषी मंत्रालय एकत्रिपणे काम करत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या व्यवसाय वृद्धीसह कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा सहभाग नोंदवावा, असे आवाहनही सरकारकडून केले जात आहे.

error: Content is protected !!