Kisan Credit Card for Farmer Loan: शेतकर्‍यांना 1.5 लाखांचे कर्ज मिळणार अवघ्या 10 मिनिटांत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहजासहजी कर्ज (Kisan Credit Card for Farmer Loan) देत नाहीत. त्यांना वेगवेगळी कारणे दाखवून कर्ज नाकारण्यात येते. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकाराकडे धाव घ्यावी लागते. शेतकर्‍यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकर्‍यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. काय आहे ही योजना (Kisan Credit Card for Farmer Loan) जाणून घेऊयात.

किसान क्रेडिट कार्ड देणार आधार (Kisan Credit Card for Farmer Loan)

देशातील शेतकर्‍यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना होणारा बँकांचा जाच कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकले आहे. सध्या देशातील दोनच जिल्ह्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि राज्यातील बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

ॲग्री स्टॅक ॲप (Agri Stack App)

या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटांत कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप मदतीला येईल. या ॲपच्या मदतीने दहा मिनिटांतच 1.5 लाख रूपयांचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. हे कर्ज त्यांना विना तारण मिळेल. मे महिन्यापासून या योजनेचा श्रीगणेशा जिल्ह्यात सुरू होणार आहे.

एकाच ॲपवर पिकांची नोंदणी (Registration of Crops on Single App)

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी (Kisan Credit Card for Farmer Loan) ॲग्री स्टॅक ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या नोंदणीसाठी सुद्धा एकच ॲप विकसीत करण्यात येत आहे. हा पण एक अनोखा प्रयोग आहे. येत्या खरीप पिकांपासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पिकांची अचूक माहिती शेतकर्‍यांनीच या ॲपच्या माध्यमातून नोंदवायची आहे.

error: Content is protected !!