Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखाचे अनुदान; जाणून घ्या महत्वाची माहिती अन अर्जप्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Kisan Credit Card) : राज्य सरकार आणि केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवत असते. बऱ्याचदा पिकांची लागवड करण्यासाठी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते. यासाठी किसान क्रेडिट योजनेद्वारे अल्पमुदत कर्ज कोणत्याही सरकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेतून मिळू शकते. या योजनेबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.

किसान क्रेडिट कार्ड घरबसल्या मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

थोडंसं योजनेबद्दल

किसान क्रेडिट योजना ही १९९८ साली अंमलात आणली गेली. या योजनेची सुरुवात ही नाबार्डने केली. योजनेच्या माध्यमातून गरीब आणि अल्पबूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करायचे असल्यास शेतकऱ्याचे वय वर्षे १८ ते ७५ वर्षे असावे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत हामीभाव मोफत कर्ज दिले आहे. Kisan Credit Card

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी करा

किसान क्रेडिट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या काही गोष्टी कराव्या लागतील. शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा.

  • सुरुवातीला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करा. त्यानंतर इंस्टॉल करा.
  • त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकून दहा अंकी मोबाईल क्रमांक भरावा आणि रजिस्ट्रेशन करावे.
  • त्यानंतर या ॲपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या योजनांची माहिती मिळू शकते. तसेच या ॲप माध्यमातून ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.
  • सुरुवातीला कृषी योजना या पर्यायात जाऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा पर्याय निवडावा. त्यानंतर Apply या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर एक अर्ज येईल जो तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे. त्यानंतर सबमिट करा. तसेच या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे असते.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्य जोडा

  • भरलेला अर्ज
  • आधार कार्ड
  • चालक परवाना
  • पासपोर्ट
  • शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे
  • मतदान ओळखपत्र

किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही वरील कागदपत्रे आवश्य जोडावी.

ऑफलाईन असा करा अर्ज

किसान क्रेडिट कार्डच्या ऑफलाइन अर्जासाठी, प्रथम बँकेत जावे लागेल. तेथे विचारलेली सर्व कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर अर्ज सबमिट करावा. बँक तुमच्याद्वारे दिलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करून तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.

error: Content is protected !!