Kisan Credit Card : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; ‘ही’ आहे शेवटची मुदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही डेअरी व्यवसाय करता असाल तर ही बातमी (Kisan Credit Card) तुमच्यासाठी आहे. शेतकऱ्यांसोबतच आता पशुपालकांसाठीही किसान क्रेडिट कार्ड बनवले जात आहे. जर तुम्ही आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवले नसेल तर तात्काळ बनवून घ्या. केंद्र सरकारच्या मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून हे कार्ड बनवले जात आहे. येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत यासाठी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. लोकसभेत मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घरोघरी जाऊन सरकारकडून हे कार्ड दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना बनवून दिले जात आहे. शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय ओळखला जातो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून दुग्धउत्पादक शेतकऱ्यांचे केसीसी कार्ड बनवले जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करता यावा हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

कसे मिळवाल कार्ड? (Kisan Credit Card For Dairy Farmers)

31 डिसेंबर 2023 पर्यंत यासाठी सरकारची टीम घरोघरी जाणार आहे. पण जर आपण दूध उत्पादक शेतकरी आहात आणि आपल्याकडे ही टीम आली नाही तर आपण जवळच्या बँकेत जाऊन हे केसीसी कार्ड मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक अर्ज दिला जाईल. तो तुम्हाला भरून त्याच बँकेत द्यावा लागणार आहे. तसेच मागितलेली काही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे. जर तुमच्या आसपास बँक नसेल तर तुम्ही डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊनही अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या कागपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला 30 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला प्रदान केले जाईल.

सरकारी योजनांचा लाभ मिळणार

भटक्या पद्धतीने शेळी-मेंढीपालन करणाऱ्या पशुपालकांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच डेअरीसह सर्व पशुपालकांना या कार्डचा लाभ, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किसान क्रेडिट कार्डच्या लाभासारखाच असणार आहे. त्यामुळे या कार्डच्या माध्यमातून पशुपालकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान, याबाबत केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने देशातील जवळपास 12 राज्यांना पत्र लिहिले आहे. ज्याद्वारे भटक्या जातीच्या पशुपालकांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता या कार्डमुळे पशुपालकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.

error: Content is protected !!