Kisan Credit Card Scheme : खरीप हंगामासाठी पीक कर्ज हवंय? ‘ही’ आहे कमी व्याजदर असलेली योजना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशांची गरज (Kisan Credit Card Scheme) असते. पीक लागवडीसाठी, खते, पाणी देण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागते. अनेक वेळा शेतकरी सावकार आणि बँकांकडून चढ्या व्याजदराने कर्जही घेतात. अशा स्थितीत पीक न आल्याने किंवा उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे येता खरीप हंगाम लवकरच सुरु होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध (Kisan Credit Card Scheme) करण्यास मोठी मदत होणार आहे.

4 टक्के व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Kisan Credit Card Scheme For Farmers)

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme) असेही म्हणतात. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन, त्यांच्या जमिनीची कागदपत्रे जमा करून आणि कर्ज घेण्याची सामान्य कागदपत्रे पूर्ण करून कर्ज घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. मात्र, यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

केसीसी कर्ज योजनेची माहिती

किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 1998 मध्ये केली होती. भारतातील कोणताही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे. यामध्ये शेतकरी चार टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. यापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्यांनी घेतल्यास व्याजदर वाढतो.

शेतकऱ्यांना किती व्याज द्यावे लागेल?

किसान क्रेडिट कार्डवर एकूण 9 टक्के व्याजदर आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 2 टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना ३ टक्के प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाते. अशा प्रकारे या कर्जावरील व्याजदर केवळ चार टक्केच राहतो. म्हणूनच याला देशातील सर्वात स्वस्त कर्ज म्हटले जाते. जे देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.

किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जमिनीशी संबंधित कागदपत्रे
  • किसान क्रेडिट कार्डसाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
error: Content is protected !!