Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डवर विमा संरक्षण मिळते? पहा.. किती मिळते आर्थिक मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना होय. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत माफक व्याजदरात शेतीसाठी कर्ज मिळते. हे सर्वश्रुत आहे. मात्र, शेतकऱ्यांना काही दुर्घटना झाल्यास, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळते का? मिळते तर किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते? याशिवाय किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या (Kisan Credit Card) माध्यमातून विमा संरक्षण मिळण्यास शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘ही’ योजना? (Kisan Credit Card Scheme For Farmers)

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना ही शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदरात 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. शेतीशिवाय पशुपालन आणि मासेपालन व्यवसायासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळते. याशिवाय शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण देखील देण्यात आले आहे.

किती मिळते विमा संरक्षण?

एखाद्या शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून किसान क्रेडिट (Kisan Credit Card) कार्ड काढले असेल. तर संबंधित शेतकऱ्याचा एखादा अपघात झाल्यास, त्यात शेतकऱ्यास अपंगत्व आल्यास किंवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशा शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. याशिवाय अन्य बाबींमध्ये शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाते.

कसे मिळते विमा संरक्षण?

किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card) माध्यमातून शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार कर्ज घेतलेले असते. प्रामुख्याने 5 वर्षांसाठी 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांचे कर्ज हे शेतकऱ्यांना मिळते. मात्र, कर्ज काढल्यानंतर अशा कर्जदार शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, किंवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कर्जदार शेतकऱ्याच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी हे विमा संरक्षण दिले जाते.

किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जमिनीशी संबंधित कागदपत्रे
  • किसान क्रेडिट कार्डसाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
error: Content is protected !!