Kisan Exhibition : शेतकऱ्यांना मोठी संधी; 13 ते 17 डिसेंबरला पुण्यात ‘किसान’ प्रदर्शन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Kisan Exhibition) करणे खूप आवश्यक बनले आहे. त्यामुळे शेतीच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होत असतात. शेतकऱ्यांना अशाच नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी (Kisan Exhibition) चालून आलीये. ‘किसान’ हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र, मोशी येथे हे या प्रदर्शनाचे ठिकाण असणार आहे.

या ‘किसान’ प्रदर्शनात (Kisan Exhibition) शेतकऱ्यांना जगातील शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रे, जोडधंदे, शेतीआधारित प्रक्रिया उद्योग, शेतमाल विक्री व्यवस्था, तसेच निर्यात साखळी, शेतकऱ्यांचे विविध नवीन प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तसेच बियाणे, खते, किटकनाशके, औषधे यांच्यासह कृषी क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्यांच्या व्यक्तीशी थेट संवाद साधण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकरी यावेळी उपलब्ध वस्तू खरेदी देखील करू शकतील. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे.

काय असेल प्रदर्शनात? (Kisan Exhibition In Pune)

दरवर्षी होणाऱ्या या प्रदर्शनाला लाखो शेतकरी आणि नागरिक हजेरी लावत असतात. पाच दिवस चालणाऱ्या प्रदर्शनास यावर्षी देशभरातून दोन लाखांहून अधिक शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यात पाचशेहून अधिक उद्योजकांच्या उत्पादनांचे स्टॉल असतील. संरक्षित शेती, पाणी नियोजन, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका याबाबतची दालने असतील. याशिवाय पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा सहभाग हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्यात भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि संशोधन संस्थांचाही सहभाग असणार आहे. शेतीतील नवउद्यमींसाठी विशेष दालन उभारले जाणार आहे. आपणही सहभागासाठी kisan.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

error: Content is protected !!